Hot Posts

6/recent/ticker-posts

*सोलापूर महानगरपालिका, सोलापूर सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय पाणी पुरवठा विभाग पाणी पुरवठा संबंधिचे जाहिरप्रसिध्दीकरण*


सोलापूर : शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टाकळी-सोलापूर मुख्य पाईप लाईनवर सोरेगांव येथे देगांव शाखा कालवा व हत्तुर नाला येथे जोडणीचे काम दि. १ एप्रिल २०२४ व २ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. सदर जोडणीकरीता व अन्य दुरुस्तीच्या कामाकरीता टाकळी पंपहाऊस बंद ठेवण्यात येणार आहे.

गतवर्षी अत्यल्प पावसामुळे सध्या उजनी धरण वजा ३६% असून सदर ठिकाणी दुबार पंपिंग करुन पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. व हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी अत्यल्प असून औज बंधारा येथील उपलब्ध पाण्याचा साठा जास्तीत जास्त टिकवण्याकरीता शहरातील मेडिकल पंपगृह, जुळे सोलापूर एम.बी. आर. नेहरु नगर टाकी परिसर व सोरेगांव पाईप लाईनवरील पाणीपुरवठा यापुढे पाच दिवसाआड प्रमाणे होणार आहे व तसेच उपरोक्त शटडाऊनच्या कालावधीत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक रोटेशन एक दिवसाने पुढे जाऊन पाच दिवसआड प्रमाणे होणार आहे.

तरी नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे ही विनंती.

*सार्वजनिक आरोग्य अभियंता सोलापूर महानगरपालिका, सोलापूर*

Post a Comment

0 Comments