Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेरामेश्वर महाराज यात्रेच्या अक्षता सोहळ्यात संपन्न



 प्रतिनिधी अकबर शेख सोलापूर बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय असा अखंड जयघोष करीत, सनई चौघड्यांचा मंजुळ आवाज, हलग्यांच्या कडकडाटात तसेच पांढराशुभ्र बाराबंदीचा पोषाख परिधान केलेल्या भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह लाखो भक्तगणांनी हा अलौकिक असा लक्ष लक्ष हातांचा अक्षता सोहळा याची देही याचा डोळा अनुभवला.
अतिशय भक्तीयम वातावरणात अक्षता सोहळा संपन्न झाला. 

यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, केदार उंबरजे, बाळासाहेब शेळके, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, गणेश डोंगरे, तिरूपती परकीपंडला, सुशील बंदपट्टे, पशुपती माशाळ, अशोक कलशेट्टी, संजय गायकवाड, राहुल वर्धा, सुभाष वाघमारे, धीरज खंदारे यांच्यासह लाखो भाविक भक्त उपस्थित होते.
 अकबर शेख पत्रकार सोलापूर

Post a Comment

0 Comments