आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तसतसे राजकीय वातावरण तापत चालले आहे. २५१ दक्षिण विधानसभा मतदार संघात ओबीसी समाजाची प्रचंड मोठी संख्या आहे. ओ.बी.सी समाजाच्या पाठबळावर अशोक ढोणे यांनी २५१ दक्षिण विधानसभेच्या आखाड्यात अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे भिवाजी वावरे, तम्मण्णा घोडके, म्हाळप्पा कारंडे, संजय बंडगर, ओगसिद्ध जनगे, सिद्राम चोपडे, अप्पासाहेब हाके यांनी सांगितले.
२५१ दक्षिण विधानसभेचा निकाल धनगर समाज ठरवू शकतो कारण दक्षिण तालुक्या मध्ये धनगर समाजचे ६५ ते ७० हजार मतदान आहे. परंतु कै. आनंदराव देवकते साहेबा नंतर धनगर समाजाला कोणत्याही पक्षाने न्याय दिला नाही. धनगर समाजातील काही ठराविक नेते मंडळीना फक्त सरपंच, सोसायटी चेअरमन, पंचायत समिती सदस्य येवढ्यावरच बोळवण केली आहे. त्यांना धनगर समाजाचे मतदार चालतात, पण यांना धनगर सामाजाचे जे महत्वाचे प्रश्न एस टी आरक्षण असेल, ग्रामीण भागातील सभागृह मेंढपाळ बंधावाचे प्रश्न मार्गी सह विविध प्रकारचे सोयीसुविधा करण्यास त्यांना वेळ नसतो. त्यामुळे धनगर समजासह बहुजन समाजाने यावेळेस ठरवले आहे नवीन चेहरा दक्षिण विधानसभे मध्ये पाठवायचे निश्चित केले आहे. दक्षिण विधानसभा मतदार संघातून लोकसंख्या नुसार धनगर समाजाला आतापर्यंत न्याय मिळाला नाही. त्यामुळे येणारी २०२४ ची विधानसभा निवडणूक धनगर समाजासह ओ.बी.सी समाजाच्या जोरावर निवडणूक लढणार असल्याचे वरील कार्यकर्ते यांनी सांगितले.
बहुजन समाजातील होतकरूच्या २४ तास ग्राउंड लेवलला काम करण्याऱ्या तरुणांना संधी देऊन सर्वसामान्य तळागाळातील गोरगरीब लोकांची सेवा करण्यासाठी दक्षिण तालुक्यातील जनता निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २००० साला पासून आजपर्यंत राजकीय व सामाजीक चळवळीच्या माध्यमातून विविध जनहितार्थ कामे मार्गी लावली आहेत. यापुढे जनतेची सेवा करण्यासाठी अशोक ढोणे यांना एक वेळेस संधी दयावी अशी साद जनतेला वैजिनाथ बिराजदार यांनी घातली आहे.
ठिकाण : सोलापूर
दिनांक : २७/०९/२०२४
आपला विश्वासू
वैजिनाथ बिराजदार
0 Comments