सोलापूर (माळशिरस)प्रतिनिधी :- माळशिरस तालुक्यातील सखल गोंधळी समाजाच्या वतीने शुक्रवारी अकलूज येथील प्रांत कार्यालया येथे गोंधळी समाज्यासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, गोंधळी समाज हा मागासवर्गीय समूह असल्याने समाजा साठी अॅट्रॉसिटी सौरक्षण कायदा करण्यात यावा, गोंधळी समाजातील वंचित व दुरभलं घटकास भूमिहीन (प्रति कुटुंब) 5 एकर जमीन देण्यात यावी, गोंधळी समाजाच्या मुलांना, मुलींना, मोफत शिक्षण देण्यात यावे, मुला-मुलींसाठी तालुका स्तरीय वसतिगृह
स्थापन करण्यात यावी, गोंधळी समाज हा भटका समूह असल्याने गृह चौकशीच्या आधारे सरसकट जातींचे प्रमाणपत्र मिळावे अशा विविध मागण्या साठी माळशिरस तालुका सखल गोंधळी समाजाच्या वतीने अकलूज येथील प्रांत कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला व मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी समाज बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित होता.
0 Comments