Hot Posts

6/recent/ticker-posts

*मुख्यमंत्र्यांच्या वचनपूर्ती सोहळ्याचा खर्च ६ कोटी**सोहळ्याच्या तारखेबाबत साशंकता, ४० हजार महिलांसाठी खाऊ पाकीट , बाटलीबंद पाणी देणार



सोलापूर: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा २५ सप्टेंबर रोजी होम मैदानावर होत आहे. त्यावर सुमारे ६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. याचे मंडपच २ कोटी २८ लाखांचे आहे. याचा ठेका लातूरच्या ड्रीम रिफ्लेक्शन इव्हेंट अॅण्ड इंटरटेंटमेंट कंपनीला मिळाला आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २ कोटी २८ लाख रुपयांची निविदा मंजूर केली.
सोहळ्याच्या तारखेबाबत अद्यापही साशंकता असल्याने मंडप उभारण्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. ४० हजार महिलांना एकत्रीत आणण्याचे नियोजन आहे.

तालुकास्तरावर जबाबदारी सोहळ्यासाठी येणाऱ्या महिलांना खाऊ पाकिटे व बाटलीबंद पाणी देण्याची जबाबदारी तालुका प्रशासनावर सोपवण्यात आली. त्याची बिले कार्यक्रमानंतर अदा केली जाणार आहेत. त्यासाठी अंदाजे १ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाकिटे वाटपासाठी प्रत्येक बसमध्ये समन्वयकाची नियुक्ती होणार आहे.

*मंडप टेंडर लातूरच्या कंपनीस •* 
मंडप उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. मंडपाचे ३ वेगवेगळ्या प्रकारचे २ कोटी २८ लाख रुपयांचे टेंडर आहेत. मंडपाचे साहित्य होम मैदानावर आले आहे, आहे, उभारणीचे काम हाती घेण्यात आलेले नाही." 
*मनोज ठाकरे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग*

Post a Comment

0 Comments