Hot Posts

6/recent/ticker-posts

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गुंडालिस्ट तयार करण्याचे काम सुरू**पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची माहिती*


सोलापूर: लोकसभा निवडणुकीवेळी पोलिसांनी गुंडालिस्ट तयार करून शहरातील अनेक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपार, एमपीडीए अन्वये कारवाई करून लोकसभा निवडणूकी दरम्यान शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधीत ठेवली होती. आता त्याच प्रमाणे लवकरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गुंडालिस्ट तयार करण्याचे काम सूरू आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीवेळी शहर पोलिस गुंडालिस्ट तयार करत आहेत. आताही तेच काम पोलिसांनी पुन्हा सुरू केले आहे. सध्या पोलिस आयुक्त एम. राजकुमार हे शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करणे, दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार किंवा व्यक्तिवर तडीपार किंवा एमपीडीए अन्वये कारवाई करून त्या गुन्हेगारांना पुण्याच्च्या वेरवडा कारागृहात पाठविणे आदी कारवाई धडाक्यात करत आहेत. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधीत ठेवणे ऐवढेच ध्येय पोलिस आयुक्त एम. राजकुमार व पोलिस उपायुक्त विजय कबाडे हे करत आहेत. शहरात चोऱ्या, घरफोड्या व गल्लीतील दादा लोक हे लोकांना उपद्रव देतात. शहरातील शांतता व सुव्यवस्थेचा भंग करतात.

तसेच सामान्य नागरिकांना धमक्या देत खंडणी मागतात.
सामान्य नागरीकांच्या जिवाला धोका होईल असे काम करतात. अशा जवळपास पोलिस आयुक्तालयाकडून ४६ जणांना तडीपार व १५ जणांना स्थानबध्द केले आहे. ही कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती. आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगार व वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांचा आकडा यावेळी वाढणार आहे.

*त्या गुन्हेगारांना तडीपार केले जाणार*
दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांना तडीपार केले जाऊ शकते. तडीपार करण्यात आलेला गुन्हेगार जर पुन्हा परत आला तर त्याच्यावर महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १४२ नुसार गुन्हा दाखल केला जातो. व त्यानंतर जर त्या गुन्हंगाराने अशा प्रकारचा गुन्हा केला तर त्या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करून त्या गुन्हेगाराची रवानगी पुणे येथील येरवडा कारागृहात करता येते, असेही पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments