अकबर शेख प्रतिनिधी (सोलापूर):-अक्कलकोट रहबर फाऊंडेशनच्या अनावरणाचे औचित्य साधूद अक्कलकोट येथील लोकापूरे मल्टीपर्पज हॉल येथे बजम -ए -गालीब व उर्दू दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाशा कोरबू हे होते.तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शाहू सतपाल,अक्कलकोट महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य एम. ए.शेख,सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन ॲड.शरद फुटाणे,माजी नगराध्यक्ष अशपाक बळोरगी,साईबाबा तरुण मंडळाचे सचिव जावेद पटेल,सेवानिवृत्त प्राचार्य हाजी अरिफपाशा पिरजादे ,माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर,ॲग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापिका नसरीन होटगीकर, नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक १चे मुख्याध्यापक खालीद खान, सेवानिवृत्त प्राचार्य अजीज शेख,प्राचार्य सुरेंद्र कंचार,दैनिक सकाळचे पत्रकार चेतन जाधव,अंकुश इंगळे, निर्भय प्रतिष्ठानचे इकबाल बागमारू,विश्व नगर विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष फारुख शेख हे उपस्थित होते.यावेळी बोलताना उर्दू घर सोलापूरचे संचालक मेहमूद नवाज अब्दुल माजीद जहागीरदार यांनी रहबर फाउंडेशनचे तोंड भरून कौतुक करत रहबर फाउंडेशनने यापुढे उर्दूचे अनेक कार्यक्रम राबवावे जेणेकरून उर्दू चे महत्व व उर्दू मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिशा मिळेल.यावेळी अक्कलकोट नगरपालिकेच्या उर्दू शाळा व अँग्लो उर्दू हायस्कूल अक्कलकोट मधील अनेक विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील ज्वलंत विषयावर ड्रामा, मुशायरा,तकरीर यावेळी विद्यार्थांनी सादर केली.यावेळी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना रहबर फाउंडेशन कडून ट्रॉफी व मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी परीक्षक म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका शम्स सय्यद (बागमारू ) व हाजी अल्लाबक्ष अब्दुल रहेमान मोमीन यांनी काम पाहिले.कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत रहभर फाउंडेशनच्या अध्यक्षा हिना बागमारू ( शेख ) यांनी येणाऱ्या काळात करिअर गाईडन्स,व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, सामान्य ज्ञानावर आधारित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा, मुस्लीम समाजातील शैक्षणिक क्षेत्रात होणारी मुलींची गळती रोखणे,अल्पसंख्याक समाजाला मिळणाऱ्या विविध योजना याविषयी जनजागृती करणे या वर विशेष भर देण्याचे प्रतिपादन केले.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रहबर फाउंडेशनच्या अध्यक्षा हिना बागमारू (शेख ), सहसचिव साजेदा बेगम मुजावर, खजिनदार तबस्मुम रफिक शेख,उपाध्यक्ष मौलाअली महमंद शरीफ बागवान, सचिव अयुब मुस्तफा गवंडी, सदस्य अब्दुल असद फुलारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीज शेख यांनी केले तर आभार साजेदा मुजावर यांनी मानले.
0 Comments