Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे क्राईम ब्रॅच व पोलीस स्टेशनच्या कारवाईत 28 आरोपींकडून 42 अग्नीशस्त्रे व 74 जिवंत काडतुसे जप्त


पुणे प्रतिनिधी नारायण अलदार: पुणे शहरात बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेने व पोलीस स्टेशनने एकूण 28 आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडून 42 अग्नि शस्त्रे व 74 जिवंत काडतुसे असा 12 लाख 95 हजार 100 रुपयांचा  मुद्देमाल पुणे पोलीसांनी हस्तगत करून त्यांच्यावर आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. 

गुन्हे शाखा युनिट 3 चे पी.आय. श्रीहरी बहिरट, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, महेंद्र कडू यांना मिळालेल्या बातमीवरून 21 मार्च 2024, 14 एप्रिल 2024, 15 एप्रिल 2024 दरम्यान 6 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. 

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक 1 चे पी.आय. क्रांतीकुमार पाटील, पोलीस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण, विजय कांबळे यांना मिळालेल्या बातमीवरून 22 मार्च 2024, 29 मार्च 2024 रोजी दरम्यान 2 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. 

गुन्हे शाखा युनिट 5 चे पी.आय. विश्वजित काईगडे, पोलीस अंमलदार अकबर शेख व विनोद शिवले यांना मिळालेल्या बातमीवरून 30 मार्च 2024 दरम्यान एका तडीपार आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. 

गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक 2 चे पी.आय. प्रताप मानकर, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे यांना मिळालेल्या बातमीवरून 1 एप्रिल 2024, 9 एप्रिल 2024 दरम्यान 4 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. 

गुन्हे शाखा युनिट 2 चे पी.आय. नंदकुमार बिडवई, पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी यांना मिळालेल्या बातमीवरून 4 एप्रिल 2024 दरम्यान एका सराईत गुन्हेगारावर कारवाई करण्यात आली आहे. 

तसेच पुणे शहरातील 14 पोलीस स्टेशनने 14 आरोपींवर 14 अग्नि शस्त्रे व 20 काडतुसे असा एकूण 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल रेकाॅर्डवरील गुन्हेगारांकडून जप्त केलेला आहे. 

सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, क्राईम ब्रॅचचे अॅडिशनल सी.पी. शैलेश बलकवडे, क्राईम ब्रॅचचे डी.सी.पी. अमोल झेंडे, क्राईम ब्रॅच 1 चे ए.सी.पी. सुनिल तांबे, क्राईम ब्रॅच 2 चे ए.सी.पी. सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, श्रीहरी बहिरट, क्रांतीकुमार पाटील, नंदकुमार बिडवई, व 14 पोलीस स्टेशनकडील अधिकारी व स्टाफने तसेच क्राईम ब्रॅचमधील अमंलदार प्रदीप शितोळे, सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, कानिफनाथ कारखेले, महेंद्र कडू, संतोष क्षीरसागर, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, विनोद शिवले, अकबर शेख व उज्जवल मोकाशी यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments