सोलापूर (प्रतिनिधी ) गेली अनेक वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना घरकुल योजना विमा योजना पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रनां पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती या सह राज्यातील पत्रकारांच्या विषयावर व्यापक प्रमाणात पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून व्यापक चळवळ उभी करून पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून महाराज राज्यात प्रसिद्ध असलेले पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची दैनिक तुफान क्रांती वृत्तपत्र च्या सोलापूर विभाग संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
*उपसंपादक ते संपादक खडतर प्रवास*
पत्रकारिता एक ध्यास चळवळ तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील अत्याचारग्रस्त अन्यायग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आगळा वेगळा आवाज काढून जनसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशवंत पवार यांनी आपली पत्रकारिता पणाला लावली असून सलग तीन वर्ष दैनिक तुफान क्रांती वृत्तपत्र ची धुरा समर्थपणे संभाळली आहे यशवंत पवार यांची धडाकेबाज लेखणी भल्याभल्यानां घायाळ करणारी असून सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी यशवंत पवार हे पत्रकारिता करत आहेत
जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांच्या कामाची व धारधार लेखणीची दखल घेऊन दैनिक तुफान क्रांती चे मुख्य संपादक मिर्झा गालिब मुजावर यांनी यशवंत पवार यांची संपादक सोलापूर विभाग म्हणून नियुक्ती केली असून जेष्ठ पत्रकार तथा नूतन संपादक यशवंत पवार यांचा ओळख पत्र व पुष्पगुछ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी नंदकुमार कांबळे अकबर शेख खालिद चंडरकी सिद्धाराम नंदरगी वैजिनाथ बिराजदार मोहन थळंगे बाबा काशीद लालकोट पाटील सह पत्रकार बांधव उपस्थित होते.
0 Comments