कोल्हापूर (प्रतिनिधी ):- सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष,
तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांची "पोलिस मित्र असोसिएशन महाराष्ट्र" सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी पोलिस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज मोरे व महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ. रजनीताई शिंदे, राज्य संपर्क प्रमुख देवप्पा शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांच्या उपस्थितीत संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय कदम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र ओळखपत्र व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
*राम हुंडारे एक सामाजिक बांधिलकी जपणारा समाजसेवक.*
राम हुंडारे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत,इको नेचर क्लबचे माध्यमातून विविध ठिकाणी वृक्षारोपण करणे, गरीब व गरजू लोकांना शासकीय योजना व शासकीय मदत मिळवून देणे, शालेय मुलांना वह्या व पेन वाटप करणे, बॅक कर्ज प्रकरणे बद्दल माहिती व मार्गदर्शन करणे, सुशिक्षित बेरोजगार लोन साठी मार्गदर्शन व सहकार्य करणे, निराधार व बांधकाम कामगार कल्याण योजने संदर्भात जनजागृती करणे व कार्ड काढण्यासाठी मार्गदर्शन करणे अशा विविध विषयांवर सामाजिक कार्य केलेले आहे.
*"पत्रकार, संपादक, शहर अध्यक्ष पद"*
पत्रकार राम हुंडारे हे पत्रकार सुरक्षा समितीच्या शहर अध्यक्ष पदी गेल्या तीन वर्षापासून कार्यरत असून. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती, राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांसाठी विमा योजना, आरोग्य योजना, अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे, पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे, पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी, पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती मार्फत राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून, पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राम हुंडारे हे करीत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन
पोलिस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज मोरे यांच्या मार्गदर्शन नुसार पोलीस मित्र असोसिएशन सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी सारा न्यूजचे संपादक व निर्भीड पत्रकार राम हुंडारे यांची निवड जाहीर केल्याची माहिती पोलीस मित्र असोसिएशनचे महिला राज्यध्यक्षा रजनीताई शिंदे यांनी दिली आहे.
0 Comments