Hot Posts

6/recent/ticker-posts

शालेय अभ्यासक्रमात आत्मसंरक्षणाच्या धड्यांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी जनजागृती आंदोलन

 

सोलापूर (प्रतिनिधी) - शालेय शिक्षणात आजपर्यंत शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून कवायत, खेळांचे प्रशिक्षण व इतर शारीरिक शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत परंतु आज काळानुरूप काळाची गरज पाहता अल्पवयीन मुलं-मुली यांच्या बाबतीत घडणाऱ्या अपहरण, विनयभंग, बलात्कार, रॅगिंग यासारख्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे अभ्यासक्रमात बदल करून सुधारणा करणे काळाची गरज आहे.

त्या अनुषंगाने भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेच्यावतीने २९ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर जनजागृती आंदोलनाचा शुभारंभ करून अशा पद्धतीचा अभ्यासक्रम शारीरिक शिक्षणात समाविष्ट करावा अशी मागणी केली त्यामुळे लहानपणापासूनच आत्मसंरक्षणाचे धडे मिळाल्यास मुला मुलींचा आत्मविश्वास वाढून भविष्यात अशा घटना पासून स्वतःचे रक्षण करण्याचे बळ त्यांच्यात निर्माण होईल व यामुळे पोलीस प्रशासन व शासन यांच्यावर पडणारा ताणही कमी होईल म्हणून शासन स्तरावर याबाबत तात्काळ निर्णय घेऊन तशा पद्धतीचा अभ्यासक्रम सुरू करावा यासाठी कालपासून विविध पद्धतीने जनजागृती मोहीम राज्यभर राबवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.अन्यथा संघटना याबाबत तीव्र आंदोलन छेडेल व यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशा पद्धतीचा इशारा देखील आंदोलनादरम्यान देण्यात आला आहे याप्रसंगी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेचे प. महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख प्रा.वर्षा गायकवाड , राज्य सहकार विभाग प्रमुख अमित गायकवाड, सचिन घोडके , मुस्ताक शेख , अशपाक जमादार सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments