महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाला लागेपर्यंत संपूर्ण राज्याचे आणि सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ पहिल्यांदाच फुलले आहे. या ठिकाणी प्रथमच उमेदवारी मिळालेले देवेंद्र कोठे हे आमदार झाले आहेत. त्यांनी एमआयएमचे फारूक शाब्दि, काँग्रेसचे चेतन नरोटे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्तर यांचा पराभव केला. प्रणिती शिंदे यांनी सोडलेला मतदार संघ आता भाजपने काबीज केल्याचे चित्र दिसत आहे.दरम्यान काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा शहर मध्य विधानसभा मतदारसंघ यंदा भाजपने खेचून आणला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत सर्वांच्या मनात धाकधूक होती. कार्यकर्त्यांची उत्कंठा शीगेला पोहोचली होती. मतदान झाल्यानंतर कोणता उमेदवार विजयी होईल, याबाबत ठोस सांगता येत नव्हते मात्र, मतमोजणीस सुरुवात झाली. पहिला फेरीला देवेंद्र कोठे यांनी लीड घेतला, त्यानंतर फारुख शाब्दि यांनी चौथ्या फेरीपर्यंत लीड घेतला. त्याफेरीनंतर मात्र देवेंद्र कोठे यांनी मोठे मताधिक्य घेतले आणि ते मताधिक्य कायम ठेवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्याला सुरू लावलेल्या देवेंद्र कोठे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी दिली. फडणवीसांचा विश्वास सार्थ ठेवत काँग्रेसच्या बालेकिल्लाला सुरुंग लावत दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय जनता पार्टीने अतिशय शांततेत हे मतदार संघ हाताळला. बंडखोरांना मागे घेण्यास शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांची यशस्वी भूमिका दिसून आली तसेच काँग्रेसवर नाराज असलेला मोची समाजाला आपल्याकडे वळवण्यात ज्येष्ठ नेते शहाजी पवार आणि अविनाश महागावकर यांचा रोल महत्त्वाचा राहिला. या निवडणुकीत भाजपने कुठेही हिंदुत्वात पुढे आणला नाही. सर्व समाजाची मते मिळवायची हा ध्येय समोर ठेवून देवेंद्र कोठे यांनी आपली प्रचार यंत्रणा राबवल्याचे दिसून आले.
0 Comments