Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रेकिंग! राज्यात मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा अन् भाजपचा मोठा निर्णय

 Jagdish Kore (प्रतिनिधी )सोलापूर: विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर भाजपने मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच महाराष्ट्राच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे पर्यवेक्षक म्हणून अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दीव, दमण, दादरा, नगर हवेली या भागाचीही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. तावडे यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
 निवडणूक अधिकारी आणि प्रदेश भाजप यांच्यात समन्वय राहावा, या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुनील बन्सल यांना पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड आणि हरियाणा राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तरुण चुग यांना केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कर्नाटक आणि लक्षद्वीप, शिवप्रकाश यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांची तर राधामोहन दास यांना राजस्थान, पंजाब, चंदीगड आणि गुजरात या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. साधारण जानेवारी महिन्यातील मकर संक्रांतीनंतर पक्षात संघटनात्मक निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकांच्या दृष्टीनेच पक्षातील नेत्यांना काही राज्यांत निरीक्षक म्हणून महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यात तावडे यांनाही दोन मोठ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारमध्ये तर पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

Post a Comment

0 Comments