Hot Posts

6/recent/ticker-posts

रोहन चव्हाण टोळीवर व त्याच्या 5 साथीदारांवर मोक्का अंतर्गत पुणे पोलीसांची कारवाई



पुणे प्रतिनिधी नारायण अलदार: बुधवार पेठेतील एका व्यवसायिकाला तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने गल्ल्यातील 5,360 रूपये रोख रक्कम चोरणारया व नागरिकांना दमदाटी करून दहशत पसरवणारया तीन आरोपींना फरासखाना पोलीसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. 

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव 1) किरण रमेश गालफाडे, वय 24 वर्षे, रा. मंगळवार पेठ,  2) जतिन संतोष पवार, वय 21 वर्षे, रा. बिबवेवाडी, 3) अक्षय संजय सगळगिळे, वय 20 वर्षे, लोहगांव असून दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेले 3 आरोपी पैकी टोळी प्रमुख 1) रोहन जयदीप चव्हाण, त्याचे साथीदार 2) ॠषिकेश फुलचंद रवेलिया, वय 21 वर्षे, लोहगाव, 3) रोहन चव्हाणचा साथीदार हे पाहिजे आरोपी आहेत.

फिर्यादी यांचा बुधवार पेठ येथे दत्त मंदिराच्या बाजूच्या गल्लीत व्हिडिओ पार्लरचे दुकान असून ते नेहमीप्रमाणे 11 नोव्हेंबर रोजी आपल्या कामगारांसह व्यवसाय करत असताना अचानकपणे 3 अनोळखी इसम हातामध्ये लोखंडी तलवार घेऊन त्यांच्या दुकानात बेकायदेशीररित्या घुसले. फिर्यादी व त्यांच्या कामगारांना आरोपींनी शिवीगाळ करत जबरदस्तीने फिर्यादींच्या गल्ल्यातील रोख रक्कम चोरली. दरम्यान आरोपींनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून आपल्याला टोळीचा दबदबा निर्माण केला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार तपासणी करून  फरासखाना पोलीसांनी आरोपीविरूध्द भा.दं.वि.सं. कलम 392, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

दाखल गुन्ह्यातील आरोपीपैकी रोहन जयदीप चव्हाण हा टोळी प्रमुख असून त्याने आपल्या साथीदारांसह बेकायदेशीररित्या आर्थिक फायदयाच्या दृष्टीने व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व वाढवण्याच्या दृष्टीने पुणे शहरातील अनेक भागांमध्ये जबरी चोरी करणे, दरोडा घालणे, खुनाचा प्रयत्न करणे या प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपीनी त्यांच्या टोळीची दहशत निर्माण केली असल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे.  

रोहन चव्हाण टोळीवर पोलीसांनी वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून देखील पुन्हा पुन्हा आरोपींनी गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1), (ll)3,(2)3(4) अंतर्गत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांना याविषयी प्रस्ताव देऊन या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींवर मोक्का अंतर्गत 81 वी कारवाई पुणे पोलीसांनी केली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढिल अधिक तपास फरासखाना विभागाचे ए.सी.पी. अशोक धुमाळ करीत आहेत. 

सदरची कामगिरी पुणे शहर सी.पी. रितेश कुमार, जाॅईट सी.पी. संदिप कर्णिक, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अॅडीशनल सी.पी. प्रवीणकुमार पाटील, झोन 1चे डी.सी.पी. संदिपसिंह गिल, फरासखाना विभागाचे ए.सी.पी. अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे सिनियर पी.आय. दादासाहेब चुडाप्पा, क्राईम पी.आय. मंगेश जगताप, क्राईम पी.आय. अनिता हिवरकर, ए.पी.आय. वैभव गायकवाड, पी.एस.आय. निलेश मोकाशी, डी.बी.चे पोलीस अंमलदार तुषार खडके, अजित शिंदे, पंकज देशमुख, शशिकांत ननावरे यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments