Hot Posts

6/recent/ticker-posts

मालेगाव येथे हजाराे बांगलादेशी व राेहिंग्यांना भारतीय करण्याचा कारखाना भाजपा नेते किरीट साेम्याया

Jagdish Kore पत्रकार: मुंबई: प्रतिनिधी 
देशभरात बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना शोधून त्यांची परत पाठवणी करण्याची मोहीम सुरू असताना मालेगाव येआहे हजारो बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना भारतीय करण्याचा कारखानाच सुरू करण्यात आला आहे, आता खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. 

मालेगाव येथे महापालिका आणि एकूणच मालेगाव तालुक्यात बांगलादेशातून बेकायदेशीरपणे आलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बनावट जन्म प्रमाणपत्र देऊन त्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना चालू आहे. सरकारने त्याची चौकशी करून लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर लष्कराच्या मदतीने सत्तेवर आलेल्या हंगामी सरकारने पाकिस्तानच्या चिथावणीला बळी पडून भारतावर कुरघोडी करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे  भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना शोधून काढून त्यांची परत पाठवणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments