Hot Posts

6/recent/ticker-posts

रोटरी क्लब ऑफ सोलापुर नॉर्थ तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कॅरिअर गायडन्स

जगदीश कोरे प्रतिनिधी (सोलापूर):-रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ तर्फे आज खास दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत  करिअर  गायडन्स       चे आयोजन करण्यात आले होते.
हे आयोजन नवी पेठ येथील शिवस्मारक हॉल मधे करण्यात आले होते. कार्यक्रमाची  सुरुवात सोलापूर जिल्हा चे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रितम यावलकर यांचे शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने आणि सरस्वती पूजनाने झाली.कार्यक्रमासाठी खास पुण्याहून आलेले कोच  योगेश नागपाल यांचे अमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.प्रमुख अतिथी श्री प्रीतम यावलकर  यांचा सत्कार  रोटरीच्या अध्यक्षा डॉक्टर जानवी मखिजा आणि संचालक सुनील दावडा यांनी केला. प्रास्तविक आणि प्रमुख अतिथी यांची ओळख दीपक आहुजा यांनी करून दिली. श्री यावलकर यांचे हस्ते योगेश नागपाल यांचा सत्कार झाला. श्री यावलकर यांनी  हे करिअर गायडन्स विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचे आहे हे सांगितले व मुलांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे महत्त्व जाणून विद्यार्थी तसेच पालक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी एम आय टी चे प्राचार्य स्वप्नील शेठ, रोटरीचे आरती गांधी, दीपक आर्वे, आसावरी सराफ, दौलत सिताफळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचालन सचिव स्वप्नील कोंडगुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील दावडा यांनी केले .

Post a Comment

0 Comments