अकबर
शेख पत्रकार (प्रतिनिधी):-दिल्ली काँग्रेस वर्किंग कमिटीचे ऐतिहासिक " नव सत्याग्रह" अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या सोबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह काँग्रेसनेते सहभागी 26 डिसेंबर 1924 रोजी महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या ठीक 100 वर्षानंतर, दिनांक 26 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी, वीर सौध काँग्रेस रोड बेळगाव येथे होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची 'नव सत्याग्रह' बैठक आणि आधिवेशन होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे, सर्व काँग्रेसचे कार्यकारणी सदस्य देशातील विद्यमान खासदार सहभागी झाले आहेत.
Pranitishinde
Priyanka Gandhi Vadra Indian National Congress Rahul Gandhi
0 Comments