अकबर शेख (प्रतिनिधी):-सोलापूर श्री साईबाबा प्रशाला व चौडेश्वरी मराठी विद्यालय विडी कामगार वसाहत कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे रोटरियन माझी व्हॉइस प्रेसिडेंट श्रीमती धनश्री केळकर मॅडम, व अंकिता कंट्रक्शन सोलापूरचे माननीय शशिकांतजी जिड्डीमणी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आली त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांच्यासमोर कवायत प्रकार सादर केले, तदनंतर विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन म्हणून त्यांनी पाहिले व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र बक्षीस म्हणून देण्यात आले, क्रेडाईचे संचालक यांनी विद्यार्थ्यांना मनोगतातून सांगितले की विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवावी आदर्श व्यक्तिमत्त्वाचे ध्येय समोर ठेवून अभ्यास केला तर निश्चितच यश मिळते व विद्यार्थ्यांनी सकस आहार भरपूर अभ्यास, चांगले विचार यातून आपली प्रगती साधता येते असे सांगितले, शाळेमध्ये गत महिन्यामध्ये घेतले गेलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र देण्यात आले अनेक विद्यार्थ्यांचे मनोगत झाली शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले शाळेत आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात माननीय शशिकांतजी जिड्डीमनी यांचा सत्कार चौडेश्वरी मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले तर धनश्री केळकर मॅडम यांचे सत्कार सविता कानडे मॅडम यांनी केले, पाहुण्यांचा परिचय श्री अनिल पाटील यांनी करून दिले, अध्यक्षीय भाषण श्री साईबाबा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री तिप्पण्णा कोळी सर यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री परमेश्वर पुजारी यांनी केले, याप्रसंगी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री बाळू जाधव, सविता कानडे मॅडम, अंजली भांडवले मॅडम, सायराबानू तेवरमनी मॅडम, प्राथमिकचे शिक्षक राजशेखर चडचण सर, परमेश्वर पुजारी सर, सुजुद्दीन काझी सर, स्वप्निल बिराजदार सर सुजाता साखरे मॅडम, गायकवाड मॅडम तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी भारत संनके, गंगाधर बहिरगुंडे आदींनी कार्यक्रम यशस्वी केले. यावेळी आपल्या शाळेच्या परिसरातील माजी विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
0 Comments