Jagdish Kore पत्रकार: मुंबई: प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रक्ररणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढे आल्यानंतर पक्षाच्या राज्य नेतृत्वाने मोठा निर्णय घेतला असून बीड जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारी व खर्च केली आहे. यापुढे पदाधिकारी नियुक्त करताना त्यांची चारित्र्य पडताळणी केली जाणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. त्याचप्रमाणे आरोपींमध्ये एका तालुका अध्यक्षाचा समावेश आहे. यामुळे राज्यात संतापाची लाट निर्माण झाली असून त्यामुळे पक्षाची बदनामी मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे लक्षात घेऊन पक्षाने कडक पावले उचलली आहेत.
उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुढील काळात पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाईल. इतकेच नव्हे तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना पक्षाचे सदस्यत्व देखील दिले जाणार नाही, असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.
0 Comments