जगदीश कोरे (प्रतिनिधी)मुंबई: प्रतिनिधीस्वतःचा स्वाभिमान जपायचा असेल तर स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढा. आम्ही तुमच्याशी युती करू, असा सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नाराज असलेले नेते छगन भुजबळ यांना दिला आहे.
पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. आपल्यावरील अन्याय हा इतर मागास प्रवर्गाचा अपमान आहे. आपला लढा मंत्रिपदासाठी नाही तर स्वाभिमानासाठी आहे, असा भुजबळ यांचा दावा आहे. याबाबत बोलताना जानकर यांनी भुजबळ यांना स्वतःचा पक्ष काढण्याचे आवाहन केले.
इथे ओबीसी समाजाची अशीच अवस्था केली जाणार आहे. आपण इथे याचिकाकर्ते आहोत. मागतकरी आहोत. जर देणारे व्हायचे असेल तर त्यासाठी स्वतःचा पक्ष काढावा लागेल. जिस समाज का दल है, उस समाज का बल है, असेही जानकर म्हणाले.
भुजबळ यांनी समता दलाचा पक्ष काढावा. आपण त्यांच्याशी युती करू. त्यांनी स्वतंत्र पक्ष सुरू करावा ही आपली विनंती आहे. या निर्णयामुळे आपल्या नाही तरी येणाऱ्या पिढ्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे, असेही जानकर म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत निश्चित ईव्हीएमचा घोळ
लोकसभा निवडणुकीत नाही मात्र विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे ईव्हीएम चा घोळ करण्यात आल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार जानकर यांनी केला. या निवडणुकीत ईव्हीएमने केवळ महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि महायुतीतील घटक पक्ष यांचीच मते दाखवली. इतर स्वतंत्र पक्षांची मते भारतीय जनता पक्षाकडे वळवण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
0 Comments