Hot Posts

6/recent/ticker-posts

◼️ माजी महापौर महेश कोठे यांच्या निधना संदर्भात सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी अकबर शेख (सोलापूर):-महेश कोठे यांनी त्यांचे वडील तात्यासाहेब कोठे यांचा वारसा समर्थपणे चालवला होता. महापौर म्हणून त्यांनी चांगले काम केले होते. पूर्वी आम्ही सर्वजण एकत्रच होतो. नंतर वेगळे झालो. ते वेगवेगळ्या पक्षात गेले पण दुर्दैवाने त्यांना राजकीय यश आले नाही. माझा एक जुना सहकारी गेल्याचे दुःख आहे. -
 सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री     काँग्रेस कमिटी: लखनौ विमानतळावर प्रचंड धुके असल्याने एअर ॲम्बुलन्स आता टेक ऑफ करू शकत नाही. त्यामुळे महेश अण्णा कोठे यांचे पार्थिव घेऊन निघणारे एअर ॲम्बुलन्स सकाळी सहा नंतर टेकऑफ घेईल व थेट सोलापूर विमानतळावर येईल. साधारण सकाळी नऊ नंतर एक तासभरासाठी अण्णांचे पार्थिव देह नागरिकांना  अंत्यदर्शनासाठी जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेच्या प्रांगणात ठेवण्यात येईल. त्यानंतर मुरारजी पेठ येथील 'राधाश्री' निवासस्थानी आणण्यात येईल. सकाळी 11 नंतर जुना पुना नाका येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.

Post a Comment

0 Comments