जगदीश कोरे (प्रतिनिधी):- मुंबई*महाराष्ट्रातील ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक व निसर्ग लेखक तसेच अनेक पद,पुरस्कारांनी सन्मानित झालेले *अरण्यऋषी मा.श्री.मारुती भुजंगराव चितमपल्ली** यांना 91 व्या शासनाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर, हार्दिक शुभेच्छा!💐5 नोव्हेंबर 1932 रोजी सोलापूरच्या मातीत जन्मलेल्या श्री.चितमपल्ली यांचे प्राथमिक शिक्षण भारतीय चौकातील टी. एम.पोरे विद्यालयात तर महाविद्यलयीन शिक्षण दयानंद कॉलेजात झाले.त्यांनी 36 वर्षे वनाधिकारी म्हणून सेवा बजावली,या सेवेच्या काळात व निवृत्तीच्या काळात मिळून जवळपास 65 वर्षे त्यांनी जंगल भटकंती केली.या साऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रवासातून त्यांनी स्वतःला घडवित-विकसित करीत साहित्याला व जगाला फार मोठी देणगी दिली आहे,त्यांनी अत्यंत सोप्या व ओघवत्या शब्दात वीस पुस्तके लिहून साहित्य समृद्ध केले,विशेष म्हणजे मूळ तेलुगु भाषिक असलेल्या या माणसाने एक लाख नवीन शब्दाचा खजिना मराठी साहित्याला उपलब्ध करुन दिला आहे,त्यांनी आयुष्यभर वने, वन्यप्राणी व पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले आहे.त्यांचे कर्तृत्व हे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.....
0 Comments