Hot Posts

6/recent/ticker-posts

बाॉलीवुड महा अरोग्य शिबीर कार्यक्रमात मोहम्मद अयाज यांचा सम्मान


जगदीश कोरे (प्रतिनिधी) मुंबई:-नुकतेच  मुंबई बाॉलीवुड महा अरोग्य शिबीर २०२५ - तर्फे सोलापुर चे गायक मोहम्मद अयाज यांचा सत्कार करण्यात आला. हा महा अरोग्य शिबीर अंधेरी येथील चित्रकुट प्रांगणात पार पडला या शिबीर मध्ये हजारों कलावंत सामील होते. या महा अरोग्य शिबीर मध्ये विना मुल्य संगीत सेवा दिल्या बद्दल मोहम्मद अयाज यांचा गौरव करण्यात आला हा गौरव ज्येष्ठ अभीनेते धीरज कुमार  यांच्या हस्ते करण्यात आला . या वेळी सिने अभिनेत्री पुनम धिल्लो , पद्मश्री सोमा घोष , खासदार निलाद्री सिंह , डॉ धर्मेंद्र , उपासना सिंह , दिपक पराश , अली खान , संगीतकार दिलीप सेन  , सुंदरी ठाकुर , माजी आमदार भारती लवेकर , टिनू आनंद , वैभव शर्मा सह अनेक मान्यवर उपस्थित होते. मोहम्मद अयाज अशा सामाजिक उपक्रमात भाग घेऊन आपला योगदान सदैव देणार असल्याचे सांगीतले।
----------------------------------------
फ़ोटो मधे - अभीनेता दिग्दर्शक धीरज कुमार , पुनम जी , मोहम्मद अयाज, डॉ धर्मेंद्र , अली खान इ.

Post a Comment

0 Comments