Hot Posts

6/recent/ticker-posts

'वाल्मीक कराड वर खुनाचा गुन्हा दाखल करा'सकल मराठा समाजाचा चक्का जामचा इशारा


जगदीश कोरे प्रतिनिधी लातूर: वाल्मीक कराड याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी दि ७ रोजी लातूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दि ९ डिसेंबर रोजी अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड हाच असल्याचा आरोप होत आहे. 

मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. त्याच्यावर खंडणीसह अन्य 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मात्र, त्याच्यावर देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करा, ही सकल मराठा समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी समाजाच्या वतीने यापूर्वी दोन मोर्चे काढण्यात आले होते. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय येथील समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments