Hot Posts

6/recent/ticker-posts

केंद्र सरकारने लागू केलेल्या नवे चार संहिता कामगार कायदे मालक धार्जिने

Jagdish Kore पत्रकार: पुणे: प्रतिनिधी
केंद्र सरकारने लागू केलेले नवे चार संहिता कामगार कायदे मालक धार्जिणे असून त्यामुळे देशातील कामगार वर्ग उध्वस्त होणार आहे. या कायद्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असा इशारा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांनी 'दि डेमोक्रॅट'शी बोलताना दिला. 

केंद्र सरकारने कामगारांना संरक्षण देणारे सर्व कायदे संपुष्टात आणले असून औद्योगिक क्षेत्रासाठी नव्याने लागू केलेल्या चार संहिता कायद्यामुळे कामगार वर्ग उध्वस्त होणार आहे. सत्तेवर कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी देखील त्यांच्याकडून कामगारांच्या नव्हे तर मालक वर्गाच्या हिताचे कायदे अमलात आणले जातात, असा आरोप भोसले यांनी केला. 

नव्या कामगार कायद्यामुळे देशभरात असंतोष निर्माण होऊन आर्थिक व सामाजिक अस्थिरता निर्माण होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची भीती आहे. त्याचबरोबर तीव्र स्वरूपाचा सामाजिक उठाव निर्माण होऊन अराजकाची स्थिती उद्भवू शकते, याकडे भोसले यांनी लक्ष वेधले. 

भोसले हे स्वतः सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड येथील नेते आहेत. त्याचप्रमाणे ते संत तुकाराम नगरचे नगरसेवकही आहेत. तरीदेखील कामगार नेता म्हणून कामगारांच्या हिताचे रक्षण हा आपल्या प्राधान्याचा विषय असल्याचे ते नमूद करतात. महाराष्ट्रात चार संहिता कायदे अमलात आणले जाऊ नयेत यासाठी भोसले यांनी तब्बल नऊ दिवस प्राणांतिक उपोषण केले होते. केंद्र सरकारच्या कायदे पुनर्गठन समितीवर भोसले यांनी नऊ वर्ष काम केले. मात्र, केंद्र सरकारकडून कामगार विरोधी कार्य केले जात असल्याचे निषेधार्थ यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

Post a Comment

0 Comments