Hot Posts

6/recent/ticker-posts

*फटाके फोडणा-या बुलेट टु व्हिलरवर खराडी पोलीस स्टेशनकडुन कारवाई*



 नारायण अलदार (प्रतिनिधी) :- पुण्यातील खराडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बुलेट चालक हे बुलेटचा सायलन्सर बदलुन मॉडीफाईड सायलन्सर बसवुन ती बुलेट सार्वजनिक ठिकाणी फिरवुन त्या बुलेटव्दारे फटाके फोडल्यासारखा आवाज करुन फिरत असल्याबाबत तक्रारी खराडी पोलीस स्टेशन येथे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्या अनुषंगाने खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय चव्हाण यांनी या कारवाई कामी श्री राहुल कोळपे, पोलीस उपनिरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन यांचे मार्फतीने दि १९/०२ /२०२५ रोजी कारवाई पथक नेमण्यात आले. त्यानुसार कारवाई पथकाने पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चौकाचौकमध्ये थांबुन मॉडीफाईड सायलन्सरव्दारे फटाके फोडणा-या बुलेट टु व्हीलर, विदाऊट नंबरप्लेट असणा-या बुलेट, रुडस हॉर्न वाजविणा-या बुलेट अशा प्रकारे एकुण ११ बुलेट गाडया ताब्यात घेतल्या. त्या बुलेट गाडयांवर कारवाई करण्यासाठी वाहतुक विभागाकडील पोलीस अंमलदाराचे मदतीने नमुद गाड्यावर एकुण ४५,०००/- रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सदरच्या बुलेट गाडयांना कंपनीचे ओरीजन सायलन्सर बसविण्यात आले व नंबर प्लेट नसलेल्या बुलेट गाड्यांना नंबर प्लेट बसवुन गाडया सोडुन देण्यात आल्या.

सदरची कारवाई पुणे शहराचे अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री मनोज पाटील, श्री हिम्मतजाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४. पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्री संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पो.स्टे. पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली राहुल कोळपे पोलीस उपनिरीक्षक, तपास पथक, खराडी पो स्टे, पुणे शहर तसेच पोलीस अंमलदार, प्रकाश आव्हाळे, शशिकांत कोल्हापुरे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, सचिन पाटील, मुकेश पानपाटील खराडी पोलीस स्टेशन व महेश जोंधळे आणि प्रकाश कदम खराडी वाहतुक विभाग यांनी केली आहे.

खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बुलेट गाड्यांना मॉडीफाईड सायलन्सर बसुन त्याव्दारे फटाके फोडल्यासारखा आवाज करुन फिरत असल्याचे दिसुन आल्यास खराडी पोलीस स्टेशन येथे श्री राहुल कोळपे, पोलीस उपनिरीक्षक, मोनं ९६६५७२६१०१० यांचे मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन श्री संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी नागरिकांना केले आहे.

Post a Comment

0 Comments