अकबर शेख (प्रतिनिधी)सोलापूर : श्री बृहन्मठ होटगी संचलित *भवानी पेठ* येथील एस. व्ही. सी. एस. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी *छोटे सायंटिस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक* पटकावला.
ज्ञान प्रबोधिनी बाल विकास मंदिराच्या वतीने *छोटे सायंटिस्ट्स प्रकल्पांतर्गत* आयोजित केलेल्या *'सोल्यूशनिंग कॉम्पिटिशन'* स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत *भवानी पेठ* येथील एस. व्ही. सी. एस. प्रशालेतील इयत्ता आठवी वर्गातील *चि. प्रथमेश माकणे, चि. ओंकार जवळे, कु. सायली भोसले व कु. दिव्या साठे* या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन *द्वितीय क्रमांक* पटकावला. या स्पर्धेत इयत्ता नववी वर्गातील *कु. स्मिता हळ्ळी, कु. वर्षा बेत, चि. मुकुंद यंगल, चि. वरद लोकापुरे* या विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील *सहशिक्षिका अंबिका नरोळे मॅडम, पुष्पलता कोरे मॅडम* यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे *प्राचार्य श्री. राम ढाले सर, प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा उपप्राचार्य श्री. रामेश्वर झाडे सर, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. महादेव वांगीकर सर* यांच्या शुभहस्ते यशस्वी *छोटे सायंटिस्ट* यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे *अध्यक्ष श्री. ढाले सर* म्हणाले,"विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच विज्ञान कथा, पुस्तके वाचून, निसर्गातील विविध घटनांबद्दल जिज्ञासू वृत्तीने, कुतूहलतेने माहिती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे असेच का?, हे तसेच का? असे विविध प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले पाहिजे. जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये शोधक वृत्ती निर्माण होत नाही, समस्यांवर उपाय शोधण्याची गरज भासत नाही, तोपर्यंत शिक्षकांनी त्यांच्यासमोर आव्हाने उभी करून संधी निर्माण केली पाहिजे."
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिकांचे काशीपीठाचे जगद्गुरू *श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्री. बृहन्मठ होटगी मठाचे मठाधिपती ष. ब्र. बालतपस्वी श्री. चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, संस्थेचे सचिव श्री. शांतय्या स्वामी सर, संचालक श्री. शशिकांत रामपुरे साहेब, श्री. शिवानंद पाटील साहेब तसेच संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य श्री. राम ढाले सर, उपप्राचार्य श्री. रामेश्वर झाडे सर, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. महादेव वांगीकर सर* तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी *अभिनंदन* करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments