Hot Posts

6/recent/ticker-posts



गणेश (प्रतिनिधी)अक्कलकोट,-  सर्वसामान्य स्वामी भक्तांप्रमाणे मीही स्वामी भक्त आहे.  याच स्वामी भक्तीच्या
माध्यमातून अक्कलकोटला आल्यानंतर समर्थांनी स्वामी दर्शनाची संधी वेळोवेळी 
देत रहावी. या माध्यमातून स्वामी कृपेचे वरदहस्त माझ्या व माझ्या कुटुंबीयांवर कायम रहावी याकरिता आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे. स्वामींच्या दर्शनानंतर लाभलेला तथा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली  
विश्वस्त समितीच्या वतीने पुरोहितांच्या हस्ते झालेला सत्कार म्हणजे जीवनातील मोठा गौरव असल्याचे मनोगत नाशिक पुर्वचे आमदार सरोजिनी हिरे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी आमदार सरोजिनी हिरे बोलत होते.याप्रसंगी मिलन कत्याणशेट्टी, व्यंकटेश पुजारी, बालाजी माने, गिरीश पवार, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे उपस्थित होते.

फोटो ओळ - आमदार सरोजिनी हिरे या वटवृक्ष मंदीरात स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आमदार सरोजिनी हिरे, मिलन कत्याणशेट्टी, व्यंकटेश पुजारी व अन्य दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments