Hot Posts

6/recent/ticker-posts

*एस.व्ही.सी.एस. मठात जठाधारी महादेव यांची प्रतिमा रांगोळीतुन साकार*/ *सोलापूरच्या रंगवलीकारांची अनोखी भक्ती*



जगदीश कोरे (प्रतिनिधी)सोलापूर महाशिवरात्री निमित्त *रंगावलीकार श्री.मल्लिनाथ जमखंडी* (कलाशिक्षक दमाणी विद्या मंदिर, सोलापूर) या कलाकाराने अक्कलकोट रोड येथील एस.व्ही.सी.एस. मठात 8 बाय 18 फूट आकाराची जठाधारी महादेवाची प्रतिमा रांगोळीतून साकार केली आहे.

महादेवाचे निस्सीम भक्त असणारे जमखंडी गेल्या 15 वर्षांपासून विरतपास्वी मठात दरवर्षी भगवान शंकराची रांगोळी साकारत आहेत.  आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने ह्या मंदिरात महाशिवरात्री च्या निमित्ताने दर्शनासाठी येत असतात. त्यावेळी आवर्जून ही रांगोळी पाहून कौतुक करतात आणि त्याचे फोटो काढुन घेतात.
ही रांगोळी 8 फूट बाय 18फूट आकाराची असून ह्यासाठी 10 किलो रांगोळी व रंग वापरण्यात आले आहेत.रांगोळी पूर्ण होण्यासाठी 6 तास लागले आहेत. रांगोळी पूर्ण करण्यासाठी कु.कलाश्री जमखंडी,  श्री.नितेश जमखंडी,श्री. रमेश मदभावी,श्री.बसवराज जमखंडी व श्री.इरेश कणगी  यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments