जगदीश कोरे (प्रतिनिधी)बेळगावी:-कर्नाटकात हा प्रकार घडला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या कृतीवरून आता संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची आज बेळगावी येथे जाहीर सभा होती. या सभास्थळीच भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक नारायण भारमानी स्टेज सुरक्षेकरता तैनात होते. महिला कार्यकर्त्यांचा गोंधळ ऐकून सिद्धरामय्या यांचा राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी तत्काळ स्टेजजवळ तैनात असलेल्या पोलीस अधीक्षकाला व्यासपीठावर बोलावून घेतलं. अन् त्यांच्यावर हात उगारला. सिद्धरामय्या पोलिसांच्या कानशिलात लगावणार होते, पण त्यांनी लगेच आपला हात खाली घेतला. "तू, तू जो कोणी आहेस, इथे ये, तू काय करत होतास?" असं रागाच्या भरात सिद्धरामाय्या यांनी विचारलं आणि त्यांच्यावर हात उगारला.
या घटनेनंतर, जेडीएसने एक्स वरील पोस्टमध्ये सिद्धरामय्या यांच्यावर अहंकार आणि गैरवर्तनाचा आरोप केला. सार्वजनिक ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यावर हात उचलल्याबद्दल पक्षाने मुख्यमंत्र्यांवर टीका केली. पोस्टमध्ये या कृत्याचे वर्णन अनादरपूर्ण असल्याचे म्हटले आहे आणि असे म्हटले आहे की अशा प्रकारचे वर्तन, ज्यामध्ये एकेरी शब्दात बोलणे समाविष्ट आहे, ते "अक्षम्य गुन्हा" आहे.
0 Comments