जगदीश कोरे (प्रतिनिधी) मुंबई: - नुकतेच महान अभिनेता मनोज कुमार यांच निधन झाल ही बाब संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टिला सुन्न करुन टाकणारी . ज्यांनी क्रांती चित्रपटातुन देशभक्तीचा संदेश देऊन प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागविली. है प्रीत जहां की रीत सदा। भारत का रहेने वाला हूं भारत की बात सुनाता हूं । मेरे देश कि धरती सोना उगले । इक प्यार नग्मा है । या सारखे अनेक सुपर डुपर हिट चित्रपट आणी गाणी रसिकांना दिली . आपल्या देशावरील प्रेम त्यांनी अख्खा जगाला दाखवून दिले. त्यांच्या निधनाने संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टि ला धक्का बसला . कधीच न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली. रविवार दिनांक ६ रोजी मुंबई येथील जूहू स्थित हाटेल जे डब्ल्यू मेरिट येथे श्रद्धांजलि चा कार्यक्रम पार पडला. या वेळी सोलापुर चे गायक मोहम्मद अयाज यांनी मानाचा मुजरा म्हणून हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांचे चिरंजीव अभीनेता कुणाल गोस्वामी व विशाल गोस्वामी सह अभिनेता धीरज कुमार, आमीर खान , सुनिल गावस्कर , जया बच्चन , अरुणा ईरानी , उदीत नारायण , सोनू निगम , सुदेश भोसले , रामशंकर , प्रेम चोपड़ा , फरहान अख्तर , स्नेहा शंकर दिपक पराश , निल नीतीन मुकेश, आदित्य शंकर , रंजीत , अरुण बक्शी , जावेद जाफरी , सह सिने अभिनेता व अभिनेत्री मोठ्या संखेनी उपस्थित होते ।।
0 Comments