Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री ग दि कुलथे यांच्या निधन

     जगदीश कोरे (प्रतिनिधी) मुंबई:- म. रा. राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य शासकीय कर्मचारी-अधिकारी संघटनेच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने काम करणारे नेतृत्व श्री. ग. दि. कुलथे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अनेकदा त्यांच्याशी चर्चा-संवाद करण्याचा प्रसंग आला. अतिशय संयमी आणि प्रशासन म्हणून राज्य सरकारचेही कुठे हित आहे, याचा जबाबदारीने विचार करणारे असेच ते नेतृत्व होते. आपल्या हक्काच्या मागण्या मांडतानाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणती पथ्ये पाळावीत, याचाही ते आग्रह करताना दिसत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या कुटुंबियांच्या आणि संघटनेतील सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments