दक्षिण सोलापूर; शहरात वाहनचोरीच्या वाढलेल्या पार्श्वभूमीवर त्याच्या तपासाकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. विजापूर नाका पोलिसांनी तीन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन मोटार सायकल जप्त केल्या आहेत. अल्पवयीन मुलेही वाहन चोरीच्या गुन्ह्यात अडकत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
सिध्देश्वर वनविहारच्या गेट समोरून दि. २१ मार्चला तर विजापूर रस्त्यावरील आदित्यनगर येथून दोन दुचाकी वाहने चोरीला गेल्या हेित. त्याच्या फिर्याद दाखल करण्यात आल्या होत्या. विजापूर नाका पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या खबरीवरून चोरीची एक दुचाकी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. त्यावेळी या दुचाकी सोबत आणखी एका दुचाकीवरून तीन अल्पवयीन मुले आली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता या दुचाकी चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले.
अल्पवयीन मुले असल्यामुळे त्यांच्या पालकांना बोलावण्यात आले. मुलांचे समुपदेशन करण्यात आले. पालकांना नोटीस देऊन सोडण्यात आले. तपास अधिकारी पोलिस नाईक शिर्के यांच्यासह पथकात फौजदार शिवकुमार गायकवाड, हवालदार सोनार, शिर्के, शेख, पोशी, बोल्ली, मारकड, आबादीराजे, माने, सुरवसे, जाधव यांचा सहभाग होता. वरीष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
0 Comments