Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिकेची दिवसात तीन कोटींची वसुली ऑनलाइन भरण्यास प्रतिसाद : उद्दिष्टपूर्ती झाल्याचा दावा


सोलापूर : महापालिकेने आर्थिक वर्षाच्या अखरेच्या दिवशी रविवारी सुमारे तीन कोटी रुपयांची कर वसुली केली. रात्री आठनंतर ऑनलाइन कर जमा होत होता. त्यामुळे हा आकडा पाच कोटी रुपयांपर्यंत जाईल, असे कर संकलन विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांनी सांगितले.
गाडेकर म्हणाले, पालिकेने १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेर एकूण ३०८ कोटी रुपयांचे कर वसुलीचे
उद्दिष्ट ठेवले होते. यामध्ये चालू वर्षातील थकबाकी आणि मागील वर्षांतील थकबाकीचा समावेश होता.
३० मार्चअखेर ३१२ कोटी रुपयांची कर वसुली झाली. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, उपायुक्त आशिष लोकरे यांनी मिळकतदारांसाठी अभय योजना राबविली होती. या अभय योजनेतून १०० कोटी रुपयांची वसुली झाली. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जप्तीची कारवाई करण्यात आली. थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद केला. शहरातील प्रमुख चौकात थकबाकीदारांची नावे फलकावर लावली. यातूनही कर वसुलीला प्रतिसाद मिळाला. ज्या मिळकती जप्त आहेत त्यावर बोजा चढविण्यात येईल. काही मिळकतींचा न जाहीर लिलाव होऊ शकतो.

*नव्या मिळकतींचा शोध घेणार*
पालिकेने नव्या आर्थिक वर्षात नोंद न झालेल्या मिळकतींचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. कर संकलन अधिकाऱ्यांना या कामाचे उद्दिष्ट दिले आहे. यातून किमान २५ कोटी रुपयांचा जादा कर मिळेल, असा विश्वास उपायुक्त आशिष लोकरे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments