सोलापूर /प्रतिनिधी -जयभिम मित्रांनो भारत देशातील लोकसभेची निवडणुकीची प्रक्रिया सरू झाली आहे मी आपणा सर्वांना विनंती पूर्वक आव्हान करतो कि या लोकशीच्या उत्सवत भरतातील सर्वच नागरिकांनी आपल्याला जो मता चा अधिकार आहे ही आपल्याला मिळालेली जी शक्ती आहे तिचा आपण 100% उपयोग केला पाहिजे जेणे करून आपण आपला अधिकार बजावू शकतो म्हणून आपण सर्वानी निवडणुकीच्या पूर्वी आपले नाव व आपल्या परिवारचे नाव हे मतदार यादीत आहे कि नाही याची खात्री करून घेणे हे गरजेचे आहे या समंबधी आपण जागृत असणे हे गरजेचे आहे म्हणून आपल्या मतदार संघतील निवडणूक कार्यालयात जाऊन आपले नाव निवडणूक यादीत आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी आणि हेच काम आपल्या परिवार मित्र मैत्रीण आणि नातेवाईक यांना ही सांगा आणि आपले नाव यादीत आहे कि नाही याची खात्री करा किंवा नाव यादीत नसल्यास ते येण्यासाठी त्याची प्रोसेस करा ही नम्र विनंती गाफिल राहू नका 2024 च्या निवडणुकीचा आपण विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल की ही निवडणूक लोकशाही विरूद्ध हुकूमशाही अशी होणार आहे.
लोकशाही संपुष्टात येणारी ही शेवटची निवडणूक असेल: -अशा जीवनमरणाच्या लढाईत आपण काय करायला पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे आपणास लोकशाही जीवंत ठेवायची असेल तर आपली चळवळीची इतर कामे आत्तापुरती बाजूला ठेवून ही निवडणूक एक मिशन म्हणून यावर काम केल पाहिजे त्याशिवाय गत्यंतर होणार नाही.
म्हणून कोणत्याही परिस्थितीत भाजप को हराओ लोकशाही बचाओ भाजप को हराओ संविधान बचाओ हा नारा आपण लावला पाहिजे
यासाठी आपण एकच काम करणे संयुक्तिक वाटते आणि ते म्हणजे भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष यांच्याविरोधात जे जे उमेदवार लढत देणार आहे .त्या उमेदवारातून जो उमेदवार दुस-या क्रमांकाचे मत घेणार आहे. त्या उमेदवाराला आपण मतदान केले पाहिजे.अशा त-हेने आपले मत विभाजन होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी.
असा जर आपण विचार केला तर आपले मत विभाजन न होता भाजपला टक्कर देणारा दुस-या नंबर चा उमेदवार निश्चित निवडून येऊ शकतो.
भाजप असो की काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो की शिवसेना असो कोणताच पक्ष आपल्यासाठी उपयोगी नाही.परंतु इतरांप्रमाणे कोणाला निवडून आणायचे हा सुध्दा आपला विषय नाही.मुख्य उद्देश आहे भाजप आणि मित्र पक्ष यांचा पराभव.हेच आपलं मिशन आहे."आतापर्यंत आलेल्या सत्ताधार्यांनी आमच्याकरिता काहीही केलेले नाही आणि हे सुद्धा काही करतीलच याची सुतराम शक्यता नाही..तरी सुद्धा हुकुमशाही आणि धर्मसत्ता प्रस्थापित होऊ नये,पुनश्च मनुस्मृती ची सत्ता प्रस्थापित होऊ नये याचा आपल्याला विचार करावा लागेल.या देशाला संविधान लागू झालं तेंव्हापासून जनता नागरिक झाली होती नागरिकांचे अधिकार प्राप्त झाले होते परंतु 2014 पासून जनता प्रजा झाली.आणि म्हणून नागरिकाचे अधिकार सुरक्षित राहावे आणि किमान स्वातंत्र्याने स्वास घेता यावा याकरिता आमची धडपड असावी. आणि म्हणून कोणताच पक्ष आमचा नाही असे असतांना सुद्धा भाजपच्या विरोधात जे जे उमेदवार लढत देणार आहेत त्या उमेदवारातून जो दुस-या क्रमांकाचे मत घेणारा आहे, त्या उमेदवारालाच आपण मत दिले पाहिजे.
असे केल्याने मत विभाजन होणार नाही आणि निश्चितच आपण भाजपला हरवू शकू.
नाही हरवू शकलो तर किमान राक्षसी बहूमत तरी मिळणार नाही, याची खबरदारी घेऊ.किमान विरोधी बाकावर बसणारा सक्षम विरोधक तरी तयार होईल आणि त्यांचा माज कमी होईल.
असे निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही.याची खात्री आहे.म्हणून आपण आपल्या वार्डामध्ये,गल्ल्यांमध्ये,गावामध्ये,शहरांमध्ये,मित्रांमध्ये,नातेवाईकांमध्ये असा प्रचार केला पाहिजे असे मनापासून वाटते.
अंबादास शिंदे
संस्थापक अध्यक्ष
भारतीय दलित पँथर
0 Comments