सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून शाळकरी मुलांच्या परीक्षा संपून त्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या यामुळे नागरिक बाहेर फिरायला जाणे पसंद करीत आहेत. प्रवासासाठी सर्वसामान्यांची पहिली पसंद म्हणून रेल्वे ने विश्वास संपादन केला आहे . त्यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या सर्व, पॅसेंजर, मेल एक्सप्रेस, सुपरफास्ट मेल एक्सप्रेस, आणि विशेष एक्सप्रेस गाड्या हाउस फुल चालत आहेत. प्रवाशांच्या सेवेत अधिक सुविधा आणण्याच्या हेतूने रेल्वे बोर्ड, मुख्यालय आणि विभागीय कार्यालयाने अनेक प्रवाश्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.त्याचाच महत्वाचा भाग म्हणून प्रवाश्यांना वेळेवर आणि जागेवर उत्तम दर्जाचे जेवणाचे म्हणजे जन- आहारचे नियोजन केले आहे. त्यामध्ये प्रवाश्यांसाठी अत्यंत माफक दरात जेवण उपलब्ध करून दिले आहे. २० रुपयात किफायती भोजन ( ७ पुरी-१७५ ग्राम, बटाट्याची सुकी भाजी -१५० ग्राम,लोणचं - १२ ग्राम), ५० रुपयात काम्बो भोजन/ नाश्ता यांचा समावेश आहे. विभागातील अनेक रेल्वे स्थानकावर मोफत थंड पाण्याचे वाटप सुद्धा रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे . विशेष म्हणजे सर्वाधिक जनरल डब्याच्या ठिकाणी थंड पाण्याच्या जार चे स्टॉल अस्थायी स्वरूपात लावले आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्लॅटफॉर्म वर पाण्याची शोधाशोध थांबली आहे.
सोलापूर विभागात सर्व रेल्वे स्थानकावर स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे. सर्व रेल्वे स्थानकावरील पिण्याच्या पाण्याचे नळ, प्लेटफार्म, रेल्वे ट्रॅक, शौचालय, सर्व खानपानाचे स्टॉल, ट्रेन मधील स्वच्छता यांची सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री. सुदर्शन देशपांडे आणि श्रीमती कल्पना बनसोडे यांच्याकडून रेल्वे स्थानकाचे निरीक्षण करण्यात आले.
प्रवाशांची गर्दी बघता त्यांना ट्रेन मध्य बसवण्याची व्यवस्था हि रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट निरीक्षक स्टाफ यांनी व्यवस्था केली आहे.
—----
0 Comments