Hot Posts

6/recent/ticker-posts

जय बजरंग जय वडार चा जयघोष करित श्री विष्णू तरुण मंडळाचा हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक


हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मड्डी वस्ती येथील श्री विष्णू तरुण मंडळाच्या वतीनं श्रींचा जन्मोत्सव सोहळा अमाप उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला दरम्यान मंगळवारी पहाटे पाच वाजता अभिषेक व महापूजा करण्यात आली. तसेच वडार समाजातील महिलांच्या लोकवर्गणीतून हनुमान मूर्ती चांदीचे पायातील वाळ,कानातील खाणपुडी व मुकुट अलंकार अर्पण करण्यात आले मंगळवारी सायंकाळी कन्ना चौक येथून हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बजरंग बलीचा भव्य असा मिरवणूक काढण्यात आले यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर महेश कोठे यांच्या उपस्थितीत बजरंग बलीची महाआरती करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय मंठाळकर,खाण संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमन शंकर चौगुले, बाबुराव निंबाळकर पाटील, राजू चौगुले, तुकाराम चौगुले, राजू निंबाळकर, दिलीप भांडेकर,लहू बंदपट्टे,लक्ष्मण विटकर, बाबा निंबाळकर अंकुश बंदपट्टे,कल्लाप्पा चौगुले लक्ष्मण ईडागोटे यांच्यासह वडार समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांना चौक येथून या मिरवणुकीस प्रारंभ होऊन मड्डी वस्ती येथे या मिरवणुकीचे समारोप करण्यात आले. जय बजरंग जय वडार चा जयघोष करीत अमाप उत्साही वातावरणात डीजेच्या तालावर समाज बांधवांनी ठेका धरत अत्यंत शिस्तबद्ध अशी मिरवणूक काढली. वडार समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या बजरंगबलीच्या जन्मोत्सवानिमित्त मोठ्या उत्साही वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आल्याचे यावेळी लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments