सोलापूर : रमजान ईद निमित्त विजापूर वेस, मीना बझार मोठ्या प्रमाणात भरत असतो. खरेदीसाठी लोकांची गर्दी होत असल्याने त्याठिकाणी वाहनांना ये-जा करण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी जाहीरनामा काढून बंदी घातली आहे. ही बंदी तीन एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान असेल.
तरी विजापूर वेसकडे येण्यास व जाण्यास पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात यावा, पोलिस, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका यांना वाहनांना हा जाहीरनामा लागू नाही. असे पोलिस आयुक्त कार्यालयाकडून सांगितले आहे.
*वाहनांसाठी बंदी करण्यात आलेले मार्ग *-
बेगमपेठ पोलिस चौकी ते विजापूर वेस, बाकळे प्रेस ते विजापूर वेस, बाराईमाम चौक ते विजापूर वेस, लक्ष्मी मार्केट ते विजापूर वेस, पंचकट्टा ते विजापूर वेस, पेंटर चौक ते विजापूर वेस, रंगरेज बोळे ते विजापूर वेस, माणिक चौक ते विजापूर वेस हा मार्ग आठ दिवस बंद असेल.
*वाहनांसाठी हा असेल पर्यायी मार्ग*
- माणिक चौक-समाचार चौक- भावसार पथ- बाराईमाम चौक-किडवाई चौक मार्गे, बेगम पेठ पोलिस चौकी - पंचकट्टा-लक्ष्मी मार्केट- दत्त चौक या चा वापर करतील.
0 Comments