-----------------------------------------------
सोलापूर : सोरेगाव येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, टाकळी पंपहाउसमधून पाणी उपसा सुरू झाला आहे.
सोलापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने साेरेगाव येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी सकाळी सहा वाजता पूर्ण करण्यात आले. टाकळी पंपहाउसमधून सात वाजता पाणी उपसा सुरू झाला. जुळे साेलापुरात दुपारी १२ च्या सुमाराला पाणी पुरवठा झाला आहे
सोलापूर शहराला टाकळी पंपहाउस ते साेरेगाव या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा हाेताे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने साेरेगाव येथे देगाव शाखा कालवा आणि हत्तूर नाला येथील पाइप जाेडणीचे काम साेमवारी हाती घेतले हाेते. त्यासाठी शट डाऊन घेण्यात आला होता. टाकळी पंपहाउसमधून साेमवारी पाणी उपसा न झाल्याने शहराच्या निम्म्या भागात पाणी पुरवठाच झाला नाही.
२४ तासांच्या आत काम पूर्ण झाले.
दाेन्ही पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम साेमवारी सकाळी ८ वाजता सुरू झाले हाेते. टाकळी येथून पाणी उपसा सुरू करून जुळे साेलापुरात पुरवठा करण्यात आला. औज बंधारा, उजनी धरणात पाणीसाठा कमी हाेत आहे. या कारणास्तव शहराच्या निम्म्या भागात पाच दिवसाआड पाणी येणार असल्याचे व्यंकटेश चौबे यांनी सांगितले.
काम पूर्ण झाल्याने उन्हाळ्या
0 Comments