सोलापूर प्रतिनिधी.जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर शहरातील 21 महिला परिचारिकांचा सन्मानचिन्ह शॉल झाडांची रोपटे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नगरसेवक तोफिकभाई शेख प्रमुख पाहुणे बाबासाहेब आंबेडकर ट्रेण्ड युनियनचे संस्थापक बापूसाहेब सदाफुले साद मल्टीपर्पस हॉस्पिटलचे चेअरमन डॉ रियाजभाई शेख परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अश्फाक शेख सर आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मा
तौफिक पैलवान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात परिचारिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले कामगार युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी परिचारिकांचे स्वागत केले व त्यांच्या प्रश्नांना युनियनच्या माध्यमातून सोडवण्याचा आश्वासन दिले. साद हॉस्पिटलचे चेअरमन रियाज सय्यद यांनी परिचारिका यांच्या कामाचे कौतुक केले तसेच यावेळी परिचारिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले व परिवर्तन फाउंडेशनच्या जिल्हा अध्यक्षपदी अहमद कोतवाल यांची निवड करण्यात आली यावेळी परिवर्तन फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान महिला प्रदेशाध्यक्ष नसीमा शेतसंधी शहर महिला अध्यक्ष लैला जमादार संगीता क्षीरसागर भारती मनसावाले अमिना शेख रेश्मा पटेल इकबालभाई शेख, इलियास बिजापूरे,बुरान काजी, इरशाद शेख, अनिल रावडे, अनवर काजी,सोहेल चौधरी शाकीर सगरी,सुलतान शेख, आदी मान्यवर उपस्थित होते
0 Comments