चिंचोळी एमआयडीसी येथील साई केमीकल या कंपनीला अचानक भीषण आग लागली.या आगीमूळे आजूबाजूचे परिसर मोठ्या प्रमाणात दूषित झाला.दरम्यान प्रहार संघटनेने यांची माहिती घेतली असता साई केमीकल कंपनी ही अवेध रित्या तिथं कंपनी चालवत असल्याचे निर्दशनास आले.याआधीही प्रहार संघटनेने विविध कंपन्यासंबधी प्रदूषण विभागाचे मोरे यांच्याकडे तक्रार केली आहे.परंतू प्रदूषण विभागाचे मोरे यांच्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे.येणार्या काळात कारवाई न केल्यास प्रदूषण विभागाचे मोरे यांच तोंड काळं केल्याशिवाय प्रहार गप्प बसणार नाही असा इशारा माध्यमांशी बोलताना प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कूलकर्णी यांनी दिला...
0 Comments