Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर बसस्थानकात नव्या शिवाई बसचे आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते थाटात लोकार्पण ;



जगदीश कोरे सोलापूर (प्रतिनिधी)राज्यात सुमारे ५ हजार बसेसच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसेसचे वाढणार जाळे अत्याधुनिक शिवाई इलेक्ट्रिक बस प्रवासांच्या सेवेत रुजू झाली असून, याचा लोकार्पण सोहळा सोलापूर बस स्थानकात संपन्न झाला. आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते या नव्याकोऱ्या इलेक्ट्रिक बसचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे सोलापूर एसटी विभागाच्या ताफ्यात आणखीन आधुनिक ७ नव्या शिवाई बस दाखल झाल्याने प्रवास अधिक गतिमान होणार आहे. मात्र यासाठी प्रवाशांना वाढीव प्रवासी भाडे द्यावे लागणार आहे. सर्वसामान्य बसच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसचे भाडे दहा टक्के जास्त असणार आहे. 

         दरम्यान, राज्याच्या परिवहन व्यवस्थेत अमुलाग्र बदल होताना दिसत आहेत. पेट्रोल डिझेल या इंधनाला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्यक्रम वाढत चाललेला आहे. वाढते प्रदूषण आणि इंधनाची महागाई यामुळे ऑटोमोबाईल तसेच वाहन क्षेत्रात बदल होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती मोठ्या प्रमाणात होत असल्याने, त्याचे परिणाम सार्वजनिक वाहतूक क्षेत्रावर देखील जाणवताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्याच्या परिवहन व्यवस्थेत देखील इलेक्ट्रिक बसेस मोठ्या प्रमाणात रुजू होत आहेत. शनिवार ( दि. ३०) नोव्हेंबर रोजी नव्या अत्याधुनिक शिवाई इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण सोहळा मोठा थाटात संपन्न झाला. राज्याचे माजी परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारे शिवाई प्रवाशांना आकर्षक आणि लाभदायक ठरत आहे. यापूर्वीच्या शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये अत्याधुनीकीकरण करण्यात आले आहे.

संपूर्ण एसी असलेली इलेक्ट्रिक बस प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक व सोयीस्कर करणार आहे. ताशी ६० किलोमीटर वेगाने धावणारी इलेक्ट्रिक बस पुशबॅक सीटमुळे प्रवाशांना आरामदायक ठरणार आहे. त्याच पद्धतीने स्वतंत्र चार्जिंग स्लॉट, स्वतंत्र एसी, इतर साहित्य ठेवण्यासाठी जागा, पुस्तके ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग, अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली शिवाई बस प्रवाशांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
जुन्या शिवाई इलेक्ट्रिक बसच्या तुलनेने नवीन शिवाई बस अत्याधुनिक व अधिक गतिमान असणार आहे. 

कोट प्रवाशांसह आमदार देशमुखांमध्ये दिसून आली उत्कंठा नव्या शिवाई इलेक्ट्रिक बसचे सोलापूर बसस्थानकावर लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रवाशांसह आमदार देशमुखांमध्ये देखील बसची माहिती घेण्यासाठी उत्कंठा दिसून आली. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी फित कापून बसचे उद्घाटन केले. तदनंतर त्यांनी बसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांकडून शिवाई बसेसच्या सर्व वैशिष्ट्यांची माहिती घेतली.

Post a Comment

0 Comments