Hot Posts

6/recent/ticker-posts

लोणावळ्यातील बस डेपोत विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी



पुणे प्रतिनिधी :- पुणे जिल्ह्यामधील  लोणावळ्यात शाळकरी मुलांनी तुफान राडा घातला आहे. दोन गटात अगदी कपडे फाटेपर्यंत हाणामारी झाली आहे. 

या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याचे पहायला मिळत आहे.

बस स्टॅन्ड परिसरतला हा व्हिडिओ असल्याचे  सांगण्यात येत आहे. या ठिकाणी शाळकरी मुलांमधले वाद हा नेहेमीचा विषय झाला आहे. 

या ठिकाणी असलेल्या शाळा व  महाविद्यालयातील वादाचे पडसाद लोणावळ्याच्या बस स्टॅन्डवर उमटत असतात. अशाच एका शनिवारी झालेल्या राड्याचा जाब विचारण्यासाठी युवकाचा भाऊ तेथे  गेला असता, या ठिकाणी पुन्हा एकदा राडा होऊन तुफान हाणामारी झाली आहे.

एकमेकांचे कपडे फाडत, डोक्यात हेल्मेटने प्रहार करण्यापर्यंत हा राडा झाला आहे. हाणामारी करणारे हे सर्व तरुण इयत्ता अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला शाब्दिक वाद हा हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. 

कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचे चित्र हया  ठिकाणी पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments