Hot Posts

6/recent/ticker-posts

सौम्य तीव्रतेचा ताण पोषक असतो - डॉक्टर निहार बुरटे



जगदीश कौर (प्रतिनिधि) : जीवनात ताण हा असलाच पाहिजे. ताण असल्याशिवाय प्रगती होत नाही.  प्रगती खुंटते.  त्यामुळे आपली प्रगती होण्यासाठी सौम्य तीव्रतेचा ताण पोषक असल्याचे डॉक्टर निहार बुरटे यांनी सांगितले. डॉक्टर बुरटे हे मनोदय न्यूरोसायकियाट्रिक सेंटरचे सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ आणि संचालक आहेत. 

सिंहगड इन्स्टिट्यूट अंतर्गत इंटर्नल क्वालिटी अश्युरन्स सेल आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थने  NBN सिंहगड इन्स्टिट्यूट च्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. हे चर्चासत्र सिंहगड इन्स्टिट्यूट च्या कॅम्पसमध्ये पार पडले. यास चांगला प्रतिसाद लाभला. 

यावेळेस प्राचार्य शंकर नवले, रोटरी नॉर्थ च्या अध्यक्षा जानवि माखिजा, संचालक सुनील दावडा, संतोष सपकाळ, दीपक आर्वे, आसावरी सराफ यांची उपस्थिती होती. मान्यवरांचा सत्कार डॉक्टर प्रा. प्रदीप तपकीरे,  प्रा. विजयकुमार बिरादार, प्रा. ए के शेख यांनी सन्मान केला. 

या चर्चासत्रात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ताण यातील फरक सांगितला. अंतर्गत,  बाह्य, विकासात्मक, परिस्थितीजन्य आणि तीव्र ताण असे प्रकार असल्याचे सांगून यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे यावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. शेवटी सिंहगड इन्स्टिट्यूट च्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनी काही प्रश्न विचारून शंकांचे समाधान करून घेतले. सूत्रसंचालन प्रा. आयेशा आलीम यांनी केले.

Post a Comment

0 Comments