Hot Posts

6/recent/ticker-posts

"वीरतपस्वी प्रशालेतून निघाली सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजांची भव्य मिरवणूक"


           अकबर शेख (प्रतिनिधी):-सोलापूर "ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर हे केवळ नाव नसून ही एक ऊर्जा आहे. धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्याची सुरुवात या नामघोषाने केल्यास निश्चितच यशप्राप्ती होते."* असे श्री. बृहन्मठ होटगी संचलित *भवानी पेठ* येथील एस. व्ही. सी. एस. प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे *प्राचार्य श्री. राम ढाले सर* यांनी प्रतिपादन केले.
           वेदमूर्ती *श्री. मन्मथेश्वर हिरेमठ सर* यांच्या मंत्रोच्चाराने मिरवणुकीस सुरुवात झाली. सोलापूर नगरीत सिद्धारामेश्वरांच्या नामाच्या जयघोषाची परंपरा जपण्याचे काम वीरतपस्वी प्रशाला करते. *बोला बोला भक्तलिंग  हर्र....बोला* या शब्दांत चैतन्य निर्माण करणारी, प्रेरणा देणारी आध्यात्मिक ऊर्जा आहे. मरगळलेल्या मनाला ऊर्जा देणाऱ्या शब्दांत जयघोष करत सिद्धारामेश्वराच्या काठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भक्तीचा मळाच फुलला होता.
           *श्री. बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा काशी पिठाचे जगद्गुरु श्री. श्री. श्री. १००८ धर्मरत्नं डाॅ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी* तसेच *दै. लोकमत* यांच्या आवाहनानुसार एस. व्ही. सी. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, *भवानी पेठ*, सोलापूरच्या वतीने श्री सिद्धारामेश्वरांच्या काठ्यांची भव्य मिरवणूक *श्री. बृहन्मठ होटगी संस्थेचे संचालक श्री. शशिकांत रामपुरे साहेब, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राम ढाले सरांच्या* शुभहस्ते संपन्न झाली.
          याप्रसंगी परिसरातील सद्भक्तांनी श्री सिद्धारामेश्वरांच्या प्रतिमेचे आणि नंदीध्वजांचे दर्शन घेऊन भक्तीभावाने वंदन केले.
           यासमयी नगरातील  *श्री. प्रभुराज विभुते, सौ. अरुणा काटकर, श्री. केदारनाथ बावी (मालक)* या भक्तगणांकडून प्रसाद वाटप करण्यात आले.
           कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे *उपप्राचार्य श्री. रामेश्वर झाडे सर, पर्यवेक्षक श्री. महादेव वांगीकर सर* यांचे मार्गदर्शन लाभले. 
            याप्रसंगी स्काऊट गाईडचे प्रमुख *श्रीकांत शेटे सर* यांच्या मार्गदर्शनाखाली गीताभारती रामपुरे, विद्या साबळे, रेखा मड्डे, रविराज पाटील तसेच प्रशालेतील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी *स्वच्छता दूत* म्हणून काम केले.
            प्रभातफेरी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments