Jagdish Kore पत्रकार: बीड: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह सिद्धार्थ सोनवणे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल 25 दिवसानंतर हे आरोपी जेरबंद झाल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हा प्रमुख मारेकरी असल्याचे मानले जात आहे. तसेच सुधीर सांगळे हा त्याचा साथीदार होता. हत्या झाली त्या दिवशी देशमुख यांचा ठाव ठिकाणा सातत्याने संशयीतांपर्यंत पोहोचविण्याचे काम सिद्धार्थ सोनवणे यांनी केल्याचे सांगितले जाते.
सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे तर सिद्धार्थ सोनवणे हा मुंबई येथे पोलिसांच्या हाती लागला. सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दहा वर्षात दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी तब्बल आठ गुन्हे केज पोलीस ठाण्यात दाखल आहेत. चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
0 Comments