पत्रकार अकबर शेख प्रतिनिधी सोलापूर :-अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर शहर व जिल्हा समस्त सोलापूरकरांच्या वतीने जुनी मिल कंपाऊंड भैय्या चौक येथे अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सुरू आहे. या सोहळ्यास खासदार प्रणितीताई शिंदे यांनी आवर्जून उपस्थित राहून ह. भ. प. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तन श्रवणाचा लाभ आणि आशीर्वाद घेतला तसेच सर्व भाविक भक्तांशी संवाद साधताना पांडुरंगाच्या दर्शनाला, वारीला येणाऱ्या साधू संत वारकऱ्यांच्या, भाविक भक्तांच्या, अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मा. नगरसेवक मनोज यलगुलवार, विनोद भोसले हजारो भाविक भक्त उपस्थित होते.
0 Comments