जगदीश कोरे (प्रतिनिधी):-सोलापूर शहरातील विस्कळित पाणीपुरवठा व गुंठेवारीच्या प्रश्नामुळे आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन शहरातील नागरिकांच्या समस्या पाणी पुरवठा व गुंठेवारीच्या प्रश्ना संदर्भात विशेष चर्चा करण्यात आल्या.
येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या करिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरातील सार्वजनिक शौचालय तातडीने दुरुस्त व दुरवस्था झालेले शौचालय पाडून नवीन बांधण्यात यावे असे आमदार विजय देशमुख यांनी त्वरित प्रश्न सोडविण्याचे सुचना देण्यात आले.
0 Comments