गणेश (प्रतिनिधी)अक्कलकोट:- एज्यूकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कुल (सलंग्नता क्रमांक - 1131419) या सी.बी.एस. ई. अभ्यासक्रमाच्या इंग्रजी माध्यम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात पार पडले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा मुक्त अविष्कार पहायला मिळाला. अक्कलकोट विरक्त मठाचे म. नि. प्र. बसवलिंग महास्वामीजी यांच्या शुभहस्ते स्नेहसंमेलनाचे उदघाट्न करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी या होत्या.
यावेळी तहसीलदार विनायक मगर, दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, गटविकास अधिकारी शंकर कवितके, संस्थेच्या उपाध्यक्षा भारतीताई खेडगी, संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, व्हाईस चेअरमन अशोक हरकूड, सेक्रेटरी सुभाष धरणे, संचालिका पवित्राताई खेडगी, ज्योती धरणे, सुधीर माळशेट्टी उपस्थित होते.
या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यानी विविध विषयांना स्पर्श करणारे कलाप्रकार सादर केले. शालेय जीवनात प्राप्त होणाऱ्या या व्यासपिठामुळे भविष्यकाळात दर्जेदार कलाकार तयार होतात. वर्षभराच्या शालेय अभ्यासक्रमातून होणाऱ्या प्रबोधनसोबतच मनोरंजन आणि जनजागृतीसाठी स्नेहसंमेलन उपयुक्त ठरतात. असे मत तहसीलदार विनायक मगर यांनी व्यक्त केले.
"बॉलीवूड 1970 ते 2024" ही मध्यवर्ती कल्पना समोर ठेवून शाळेचे प्राचार्य व्यंकटेश बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. निर्भया हत्याकांड, बेटी बचाव बेटी पढाव, विष्णुपुराण, वैज्ञानिक प्रगती, अशा विविध विषयांना स्पर्श करणारे कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच 2023-24 या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट शिक्षक, शिक्षिका, सेविका, वाहन चालक यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्नेहसंमेलन पाहण्यासाठी विद्यार्थी पालकांसह अक्कलकोट शहरातील कलाप्रेमी अबालवृद्ध नागरिक उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सुनीता हिंडोळे यांनी केले तर प्रतिभा कवडे यांनी आभार मानले. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments