Hot Posts

6/recent/ticker-posts

गोगांव येथे श्री कल्लेश्वर मंदीराचा कळसारोहण कार्यक्रम


            गणेश (प्रतिनीधी) अक्कलकोट:-गोगांव येथील श्री कल्लेश्वर मंदिराचे कळसारोहण कार्यक्रम दिनांक १०फेब्रुवारी रोजी आयोजन केले असुन श्री श्री श्री १००८ जगद्‌गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वराध्याय शिवाचार्य भगवदपादरु,महाकाशिपीठ यांच्या अमृतहस्ते होणार असुनश्री म.नि. प्र. राजशेखर महास्वामीजी नंदगांव, श्री म.नि.प्र.बसवलिंग महास्वामी विरक्त मठ अक्कलकोट,श्री म.नि.प्र.प्रशांत महास्वामी विरक्त मठ हत्तीकणबस,श्री मनि.प्र.शिवलिंग महास्वामी विरक्त मठ वागदरी, श्री.ष.ब्र.श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी संस्थान मठ नागणसुर या पूज्य महास्वामीजींच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती श्री कल्लेश्वर देवस्थान ट्रस्ट, अध्यक्ष अशोक मुलगे, खजिनदार प्रदिप जगताप आणि सचिव संजय सुरवसे यांनी दिली आहे.
      सलग तीन दिवस धार्मिक कार्यक्रमाचे केले असुन
शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते ५ संत गोरोबा काका महिला भजन मंडळ, सोलापूर यांजकडून भक्तीसंगीत,सायंकाळी ५ ते ८प्रा. राजकुमार कटकधोंड (दयानंद कॉलेज, सोलापूर), किरण निळ देशमुख (पोलीस निरिक्षक) यांचा गायनाचा कार्यक्रम तर ह.भ.प. कु. वैष्णवीताई भुसाळे उजळंब, ता. बसवकल्याण, जि. बीदर यांचा रात्रि ८ ते १० वाजता किर्तनाचा कार्यक्रम होत आहे.
रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ५ ते ८ श्री कल्लेश्वरास रुद्राभिषेक,सकाळी ९:०० वाजता दांपत्य पुजन, सकाळी १०:०० वाजता आरोग्य शिबिर, संयोजक पद्मवती माता मल्टीस्टेट बँक, वागदरी यांच्या वतीने सायंकाळी ४ ते ५:३० वा. ह.भ.प.श्री काशिनाथ महाराज गुरव (हसापूर) यांचे प्रवचन,
सायंकाळी ५:३० वा. लक्ष दिपोत्सव सोहळा श्री म.नि.प्र. राजशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात होणार आहे.
    तदनंतर रात्री ८:३० वा. श्री हनुमान भजन मंडळ, उजनी, ता. औसा व श्री हनुमान भजन मंडळ, खैराट तसेच शिवभजन मंडळ चिंचोळी के यांचे भजन होणार आहे.संभाजी घरे महाराज, गोराळ ता. निलंगा यांजकडून भजन, भारुड व जागरणाचा कार्यक्रम,
सोमवार १० फेब्रुवारी २०२५ सकाळी ८ वा. श्री कल्लेश्वराचे पालखी व कळस समारंभ सुहासिनींकडून गंगास्थळ व कुंभ मिरवणूक निघणार आहे.
हरिभजन मंडळ वेदांत आश्रम शाळा, शेळगांव बार्शी यांचे भक्ती संगीत कार्यक्रम सोबत श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वराध्याय शिवाचार्य भगवदपादरु महाकाशिपीठ यांचे वाजत गाजत भव्य मिरवणूक व त्यांच्या अमृतहस्ते कळसारोहण कार्यक्रम सकाळी ११:३५ मि. संपन्न होणार आहे.
अन्नदान सेवा दि. ८ ते १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत मल्लप्पा अमृत कलशेट्टी,मधुकर चंद्रकांत सुरवसे, दत्तात्रय हणमंतराव पाटील,रमेश लक्ष्मण बिराजदार (इंजिनियर )यांच्यावतीने महाप्रसाद वाटप होणार आहे. भाविक भक्तांनी कार्यक्रमांस उपस्थित राहून महाप्रसादाचे लाभ घ्यावे असे आवाहन सरपंच वनिता मधुकर सुरवसे,उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, यांनी केले आहे.

चौकट
 सचिन कल्याणशेट्टी, खा.प्रणित शिंदे,आ.विजयकुमार
 देशमुख,आ.सुभाष देशमुख,माजी गृहराज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडकाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले,श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष,महेश इंगळे,माजी कृषि सभापती मल्लिकार्जुन पाटील,माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, माजी जि.प. सदस्य शिवानंद पाटील,
बसवराज शेळके,भाजपाचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड,स्वामीनाथ नागुरे,अविनाश मडीखांबे,आनंद तानवडे यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच सह आदीची उपस्थिती लाभणार आहे.
चौकट

Post a Comment

0 Comments